
मुंबई : जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दंगलसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऑलिम्पिक विजेता रवी कुमार दिया, ऑलिम्पियन नरसिंग यादव, कॉमनवेल्थ विजेता राहुल आवारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने रंगणार्या कुस्तीत ५० महिला खेळाडूंच्या कुस्त्याही खेळविण्यात येणार आहेत. ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी एस्टोनियाच्या युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूलाशी भिडेल. महाराष्ट्र केसरी अमृता पुजारीची गाठ रोमानियन ऑलिम्पियन कॅटालिना क्सेंटशी पडेल.