esakal | ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये 'व्हायरस इमर्जन्सी'
sakal

बोलून बातमी शोधा

japan Olympic

ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये 'व्हायरस इमर्जन्सी'

sakal_logo
By
सुशांत जाधव

जगातील मानाची समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतलाय. ऑलिम्पिकच्या दरम्यान टोकियोत आणीबाणीची लागू करण्यात आलीये. जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांनी याची घोषणा केली. जपानच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार, सोमवारपासून 22 ऑगस्टपर्यंत टोकियोत आणीबाणी लागू असणार आहे.

एका बाजूला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक टोकियोत दाखल झाले आणि दुसऱ्या बाजूला जपान सरकारने हा निर्णय जाही केला. या निर्णयामुळे 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा ही आणीबाणीतर पार पडेल. देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जपानच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यामुळे यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा ही प्रेक्षकांशिवायच पार पडणार आहे.

हेही वाचा: Euro 2020 : डॅनिश गोलीच्या डोळ्यांवर लेझरचा मारा (VIDEO)

जपानमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. स्पर्धा प्रेक्षकाविना खेळवण्यात आली तर जोखीम निश्चितच कमी असेल, अशा प्रतिक्रिया यापूर्वीच उमटल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी प्रवाशांना नो एन्ट्रीचा बोर्ड दाखवल्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत मर्यादित जपानी नागरिकांना प्रवेश देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र आता आणीबाणीच्या घोषणेमुळे प्रेक्षकांसाठी मैदाने लॉक होणार आहेत.

हेही वाचा: Euro 2020 : हॅरीच्या फ्री किकवर इंग्लंडनं रचला इतिहास; पहिल्यांदाच खेळणार फायनल!

सध्याच्या घडीला टोकियोत कोरोनासंदर्भात कठोर नियम लागू नाहीत. त्यामुळे शहरातील कोरोनाचा आकडा वाढताना दिसतोय. बार आणि रेस्टोरंटच्या वेळा बदलूनही कोरोना रुग्ण संख्येत फारसा फरक पडलेला दिसत नाही. कोरोनाच्या संकटजन्य परस्थितीमुळे जपानमध्ये चौथ्यांदा आणीबाणी लागू करण्याची वेळ आलीये. बुधवारी टोकियोत 920 नवे रुग्ण आढळले होते.

loading image