FIFA World Cup 2022 : चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीला जपानने दिला पराभवाचा धक्का

FIFA World Cup 2022 Germany Vs Japan
FIFA World Cup 2022 Germany Vs Japanesakal

FIFA World Cup 2022 Germany Vs Japan : फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनानंतर आता जर्मनीला ग्रुप स्टेजमध्ये मोठा धक्का बसला. 4 वेळा फिफा वर्ल्डकप जिंकणाऱ्या जर्मनीला जपानने 2 - 1 असे पराभूत केले. जर्मनीने पहिल्या हाफमध्ये दादा संघासारखा खेळ करत जपानवर 1 - 0 अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या हाफमध्ये जपानने झुंजार खेळी करत जर्मनीचे आव्हान परतवून लागवले. जपानकडून रिट्सू डोआनने 75 व्या मिनिटाला तर ताकुमा असानोने 85 व्या मिनिटाला गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पहिल्या हाफमध्ये जर्मनी सुसाट

जपानविरूद्धच्या पहिल्या हाफमध्ये बलाढ्य जर्मनी एकदम सुसाट होती. जर्मनीच्या गुंडोगनने 33 व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. त्याला जपानच्या गोलकिपर गोंडाच्या चुकीमुळे पेनाल्टी मिळाली त्याचे गुंडोगनने गोलमध्ये रूपांतर करण्यात कोणतीही चूक केली नाही. फक्त पहिल्या हाफची चर्चा करायची झाली तर जर्मनीने जपानच्या गोलपोस्टवर 15 वेळा आक्रमक चाली रचल्या. त्यातील 6 शॉट्स हे त्यांचे ऑन टार्गेट होते. दुसरीकडे बचावात्मक मोडमध्ये असलेल्या जपानला एकदाही जर्मनीच्या गोलपोस्टवर आक्रमण करता आले नाही. बॉलचा ताबा आणि पासिंग या दोन्ही बाबतीत जर्मनी जपानच्या खूप पुढे होती.

FIFA World Cup 2022 Germany Vs Japan
FIFA World Cup 2022 : पॉर्न स्टारने कतारमध्ये जाणाऱ्या इंग्लंडच्या फॅन्सना दिला सल्ला, म्हणाली...

दुसऱ्या हाफमध्ये जपानचे झुंजार पुनरागमन

पहिल्या हाफमध्ये जर्मनीचा धडाका पाहून हा सामना जर्मनी सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र दुसऱ्या हाफमध्ये जपानने झुंजार खेळी करत जर्मनीच्या गोलपोस्टवर आक्रमक चाली रचल्या. त्यांनी 12 पैकी 4 शॉट्स अचून गोलपोस्टच्या दिशेने मारले. त्यातील दोन शॉट्सवर गोल करण्यात जपानला यश आले. जपानकडून पहिला गोल हा रिट्सूने 75 व्या मिनिटाला केला. जपानने बरोबरी साधत जर्मनीचे आक्रमण देखील रोखण्यात यश मिळवले. त्यांच्या बचाव फळीने जर्मनीचे 9 शॉट्स परतवून लावले. दरम्यान हा सामना 1 - 1 अशा बरोबरीत राहील असे वाटत असतानाच ताकूमा असानोने 83 व्या मिनिटाला जपानचा दुसरा गोल करत जर्मनीला मोठा धक्का दिला. यानंतर जर्मनीने इंज्यूरी टाईमपर्यंत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला मात्र जपानने त्यांचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला.

हेही वाचा : Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com