बुमराहच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा

बुमराहची पत्नी संजनाच्या इन्स्टाग्राम पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा बुमराह सध्या त्याच्या पत्नीसोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे Jasprit Bumrah and wife Sanjana Ganesan post adorable Instagram Post win hearts of Fans See Photo vjb 91
Bumrah-Sanjana
Bumrah-Sanjana
Updated on

बुमराह सध्या त्याच्या पत्नीसोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे

Ind vs Eng Test: भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीत (Ind vs Eng 1st Test) इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली. त्यामुळे पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावा तर इंग्लंडला ९ बळींची गरज होती. पण पावसामुळे (Rain Stopped Play) पाचव्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे कसोटी अनिर्णित (Match Drawn) राहिली. या सामन्यात दमदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गोलंदाजांच्या यादीत Top 10 मध्ये प्रवेश केला. पण सध्या बुमराह एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे.

Bumrah-Sanjana
Tokyo Olympics मधील वर्तन भोवलं; कुस्तीपटू विनेश फोगाट निलंबित

बुमराह आणि त्याची पत्नी संजना हे दोघे सध्या इंग्लंडमध्ये आहेत. बुमराहचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. त्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी त्याने अप्रतिम कामगिरी केली. त्यानंतर आता आजपासून दुसरी कसोटी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्याआधी बुमराह आणि त्याच्या पत्नीचा फोटो चांगलाच चर्चेत आहे. पत्नी संजना हिने त्यांचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोला काही वेळातच खूप लाईक्स मिळाले आहेत.

Bumrah-Sanjana
शास्त्रींनंतर भारताचे नवे कोच कोण? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

बुमराहची दहा स्थानांची हनुमानउडी

भारताकडून पहिल्या सामन्यात भेदक गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत Top 10 मध्ये स्थान मिळाले. त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ बळी टिपले. त्यासोबतच त्याने थेट १० स्थानांची उडी घेत नववी जागा पटकावली. Top 10मध्ये इतके दिवस केवळ भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानी होता. त्यात आता बुमराहचीही भर पडली. त्यामुळे आता भारताला बुमराहकडून लॉर्ड्स कसोटीत अधिक अपेक्षा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com