शास्त्रींनंतर भारताचे नवे कोच कोण? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत
BCCI चे काही अधिकारी या खेळाडूशी चर्चा करत असल्याचीही माहिती
शभारतीय क्रिकेट संघ गेल्या काही वर्षात ICC ने आयोजित केलेल्या कोणत्याही स्पर्धांचे विजेतेपद मिळवू शकलेला नाही. २०१९मध्ये झालेल्या वन डे विश्वचषक स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये बाहेर पडावे लागले. २०२१मध्ये झालेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाली. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष २०२१च्या टी२० विश्वचषक स्पर्धेकडे लागले आहे. ही स्पर्धा आता अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत ही स्पर्धा झाल्यावर संघाचे कोच रवी शास्त्री प्रशिक्षकपद सोडणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच, BCCIचे अधिकारी एका माजी क्रिकेटपटूशी नवा कोच होण्यासाठी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरूण आणि फलंदाजी कोच विक्रम राठोड हे तिघेही आपापल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टी२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर हे तिघेही आपल्या पदाचा त्याग करणार असल्याचे बोलले जात आहे. रवी शास्त्री यांनी BCCI ला विनंती केली आहे की त्यांचा प्रशिक्षकपदाचा करार वाढवू नये असे सांगितल्याचेही बोलले जात आहे. त्याशिवाय, कोचिंग स्टाफमधील काही सदस्य विविध IPL संघांसोबत चर्चा करत आहेत. अशा परिस्थितीत BCCI चे काही सदस्य माजी फलंदाज राहुल द्रविड याच्याशी प्रशिक्षकपदाबद्दल चर्चा करत असल्याचेही सांगितले आहे.

Rahul Dravid
शास्त्री आणि टीम इंडिया
रवी शास्त्री भारतीय संघासोबत सर्वप्रथम २०१४ मध्ये संचालक म्हणून कार्यरत झाले. २०१६ टी-२० विश्वचषक संपेपर्यंत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर वर्षभरासाठी अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पराभूत झाला. त्यानंतर शास्त्रींना पूर्णवेळ प्रशिक्षकपदी नेमण्यात आले. पण ICCच्या स्पर्धांमध्ये मात्र भारताला अद्याप विजेतेपद मिळालेले नाही.