

John Wright Reveals How Jasprit Bumrah Was Discovered and Why Even Sachin Tendulkar Could Not Predict His Bowling Action
sakal
खाईस्टचर्च: क्रिकेट विश्वातील सध्याचा सर्वांत अव्वल गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराचा दरारा आहे, पण याच बुमरा नावाचा हा हिरा भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी हेरला होता. मुंबई इंडियन्स ते भारतीय संघ असा बुमराचा प्रवास झाला आणि क्रिकेट विश्वात सध्याचा तो महान वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराचा प्रवास कसा झाला हे कथन करताना जॉन राईट म्हणतात, बऱ्याच गोष्टी केवळ कर्मधर्म संयोगाने घडतात. २०१३ मध्ये मी मुंबई इंडियन्स संघासाठी नवीन गुणवान खेळाडू शोधायचे हे काम अनिल कुंबळेबरोबर करत होतो. त्या वेळी त्या वर्षी पश्चिम विभागाचे मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धेचे तीन सामने बघायला मी गेलो होतो. त्यातील मुंबई वि. गुजरात सामन्यात मुंबईचा संघ जिंकणार वाटत असताना एक गोलंदाज आला,