esakal | INDvsWI : विहारीच्या शतकानंतर बुमराची हॅट्ट्रिक; भारताचे वर्चस्व
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah

कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा बुमरा तिसरा भारतीय
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून हॅट्ट्रिक घेणाऱा जसप्रीत बुमरा हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हरभजनसिंग आणि इरफान पठाण यांनी हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.

INDvsWI : विहारीच्या शतकानंतर बुमराची हॅट्ट्रिक; भारताचे वर्चस्व

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जमैका : अष्टपैलू हनुमा विहारीच्या शतकी खेळीनंतर भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराने मिळविलेल्या हॅटट्रिकमुळे भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वर्चस्व मिळविले आहे. भारताचा डाव 416 धावांत संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर विंडीजच्या 7 बाद 87 धावा झाल्या आहेत.

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसातल्या पहिल्या चेंडूवर विंडीज कर्णधार जेसन होल्डरने रिषभ पंतचा त्रिफळा उडविला. मात्र, त्यानंतर हनुमा विहारीने भारताची धावसंख्या तीनशेच्या पार नेली. दुसऱ्या दिवसाची भारताची सुरवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर पंतचा बचाव प्रतिस्पर्धी कर्णधार होल्डरने भेदला. त्यानंतर खेळायला आलेल्या रवींद्र जडेजाने विहारीला साथ केली. मात्र, मोठी भागीदारी करण्यात त्यांना अपयश आले. कॉर्नवॉलने जडेजाला (16) बाद केले. या जोडीने सातव्या विकेटसाठी 38 धावा जोडल्या. पहिल्या दिवशी मयांकने दाखवलेला संयम दुसऱ्या दिवशी विहारीने दाखवला. विंडीजच्या वेगवान माऱ्याला त्याने हिमतीने तोंड दिले. पहिल्याच चेंडूवर पंत बाद झाल्यावर त्याने काळजीपूर्वक धावा घेत जडेजासोबत भारताचा डाव बांधला. कॉर्नवॉलच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाल्यावर त्याने सलग दोन चौकार लगावत पुन्हा आत्मविश्‍वास मिळविला. जडेजाला बाद करून कॉर्नवॉलने विंडीजला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर ईशांत शर्माने उपाहारापर्यंत विहारीला साथ केली. धावबाद होताना वाचलेल्या ईशांतने नंतर मात्र धावा करण्याची घाई केली नाही. भारताने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राच्या खेळात केवळ दोन गडी गमावून 72 धावांची भर घातली. 

मात्र, त्यानंतर हनुमा विहारीने ईशांतच्या साथीने भारताची धावसंख्या 400 च्या पार नेली. विहारी शतक साजरे केले, तर ईशांतनेही अर्धशतकी खेळी करत सर्वांची मने जिंकली. विहारीच्या कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या विंडीजच्या एकही फलंदाजाला बुमरासमोर तग धरता आला नाही. बुमराने डॅरेन ब्राव्हो, शमरा ब्रुक्स, रोश्टन चेस यांना बाद करत कसोटी कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक नोंदविली. बुमराने सहा बळी घेत दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची 7 बाद 87 अशी दयनीय अवस्था केली. विंडीज अद्याप 329 धावांनी पिछाडीवर आहे.

कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा बुमरा तिसरा भारतीय
कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून हॅट्ट्रिक घेणाऱा जसप्रीत बुमरा हा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हरभजनसिंग आणि इरफान पठाण यांनी हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी केली होती.

loading image
go to top