esakal | अखेर बुमराहचं शुभमंगल; संजनासोबत घेतले सात फेरे
sakal

बोलून बातमी शोधा

jasprit bumrah

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं लग्न झालं असून सोशल मीडियावरून त्याने फोटो शेअर केले आहेत. संजना गणेशनसोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. 

अखेर बुमराहचं शुभमंगल; संजनासोबत घेतले सात फेरे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं लग्न अखेर झालं असून सोशल मीडियावरून त्याने फोटो शेअर केले आहेत. संजना गणेशनसोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. गोव्यात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. बुमराहच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु होती. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात तो खेळला नव्हता. बुमराहने सुट्टी घेतल्यानंतर तो लग्न कोणाशी करणार याची याची चर्चा सुरु होती. याबाबत कमालीची गुप्तता त्याने पाळली होती. मात्र अभिनेत्री तारा शर्माने सोशल मीडियावरून दोघांना लग्नासाठी शुभेच्छा दिल्यानंतर दोघांचे लग्न होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. 

बुमराहने फोटो शेअर करताना म्हटलं की, आम्ही आमच्या नव्या प्रवासाला सोबत सुरुवात करत आहे. आजचा दिवस आनंदी दिवसांपैकी एक आहे. 

क्रीडा विषयक इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोण आहे संजना गणेशन 
2012 मध्ये संजना पहिल्यांदा स्प्लिट्सविला 7 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तेव्हा दुखापत झाल्यानं संजनाला कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला होता. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेलही होती. याशिवाय 'फेमिना ऑफिशिअली गॉर्जिअस' पुरस्कार जिंकला आहे.  '2021 फेमिना स्टाईल दिवा' फॅशन शो मध्येही ती सहभागी झाली होती. संजना 'फेमिना मिस इंडिया पुणे' स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. संजनाने 2019 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपवेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर मॅच पॉइंट आणि चिकी सिंगल्स हे कार्यक्रम केल होते. याशिवाय ती प्रीमिअर बॅडमिंटल लीगची होस्टसुद्धा होती. 

loading image
go to top