Jasprit Bumrah
Jasprit Bumrah

INDvsAUS: Jasprit Bumrah OUT; सामना सुरु असतानाच आली मोठी अपडेट

पहिला कसोटी सामना सुरु असतानाच भारताला मोठा धक्का बसला
Published on

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 सुरु झाली आहे. पहिला कसोटी सामना सुरु असतानाच भारताला मोठा धक्का बसला आहे.

मालिकेतील संपूर्ण 4 सामन्यांसाठी भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर झाला आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. जसप्रीत बुमराहची पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड झाली नव्हती, मात्र आता तो संपूर्ण मालिकेतूनच बाहेर पडला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित 2 कसोटींसाठी बुमराह फिट होऊन त्याची निवड होईल. अशी शक्यता क्रिकेट वर्तुळात वर्तवण्यात येत होती. मात्र या रिपोर्टमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांची आशा मावळली आहे. मात्र बुमराह ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमधून कमबॅक करु शकतो, असंही या रिपोर्टमध्ये म्हटंल आहे. पण दुसरी आणि तितकीच महत्वाची बाब म्हणजे बीसीसीआयकडून बुमराहबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुमराह ठीक झाला आहे. तो दुखापतीतून सावरत आहे. त्याने सरावालादेखील सुरुवात केली आहे. मात्र, टीम मॅनेजमेंट बुमराहच्या बाबत कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाही. यामुळेच बुमराहला कसोटीतून मालिकेतून बाहेर ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com