
IND vs SL: घाई केलीस लेका! जसप्रीत बुमराहवर चाहते जाम भडकले
Jasprit Bumrah Return To Indian Team : भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांनंतर वनडे मालिकेतही खेळायची आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह पाच महिन्यांनंतर टीम इंडियात परतला आहे. दुखापतीमुळे बुमराह आशिया कप 2022 आणि टी-20 विश्वचषक 2022 खेळू शकला नाही. आता तो संघात परतताच चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा: IND vs SL: एंन्ट्री असावी तर अशी! पदार्पणाच्या सामन्यात रचला इतिहास
बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे मालिकेसाठी जसप्रीत बुमराहचा टीम इंडियात समावेश केला आहे. तो बराच काळ टीम इंडियाच्या बाहेर होता. आता तो टीम इंडियामध्ये परतताच चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, तो थेट आयपीएलमध्ये फिट झाला असता.
जसप्रीत बुमराह हा किलर बॉलिंगमध्ये ओळखला जातो. तो क्रिकेट जगतातील सर्वोत्तम यॉर्कर फेकतो आणि अतिशय किफायतशीर असल्याचे सिद्ध करतो. कोणत्याही फलंदाजाला मुकाबला करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने टीम इंडियासाठी 30 टेस्ट मॅचमध्ये 128 विकेट्स, 72 एकदिवसीय मॅचमध्ये 121 विकेट्स आणि 60 टी-20 मॅचमध्ये 70 विकेट घेतल्या आहेत.
भारतीय संघ :
रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, श्रेयस अय्यर, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, जसप्रीत.