esakal | बुमराने सांगितले यॉर्करच्या यशामागील गुपित 
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. यॉर्कर टाकण्यात माझी काही मास्टरी नाही. जमत नसेल तर पुन्हा पुन्हा सराव करा. जोपर्यंत समाधान होत नाही, तोवर न थकता चेंडू टाकत राहा. सामन्यात खेळपट्टीचा अंदाज घेतो आणि मग गोलंदाजीचे नियोजन ठरवतो. 
- जसप्रित बुमरा, भारताचा वेगवान गोलंदाज 

बुमराने सांगितले यॉर्करच्या यशामागील गुपित 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

​बर्मिंगहॅम : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत जसप्रित बुमरा आणि त्याचे यॉर्कर याची चांगलीच चर्चा होत आहे. या स्पर्धेत यॉर्कर बुमराचे हुकमी अस्त्र ठरले असून, भारताच्या यशस्वी वाटचालीत हे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. 

बुमराने बांगलादेशविरुद्धदेखील आपली ओळख बनललेल्या यॉर्करचा अचूक उपयोग करून घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आपल्या यॉर्कर टाकण्याच्या कलेविषयी बोलताना बुमरा म्हणाला, ""वेगवान गोलंदाजी करताना यॉर्कर हे अस्त्र आधी शिकून घेतले, समजावून घेतले आणि नंतर नेटमध्ये कठोर मेहनत करून ते घोटवले. नेटमध्ये तासन्‌ तास यॉर्करचा सराव केल्यामुळे त्यावर प्रभुत्व दाखवू शकलो.'' 

एकदिवसीय क्रिकेटमधील "डेथ ओव्हर्स' म्हणजे अखेरच्या दहा षटकांत अलीकडे बुमरा सर्वात भेदक गोलंदाज ठरला आहे. बुमरा म्हणाला, "यामागे नेटमधील सराव कारणीभूत आहे. सामन्यात जे चेंडू टाकायचे तो प्रत्येक चेंडू मी नेटमध्ये टाकतो. या तयारीमुळेच मला सामन्यात गोलंदाजी करणे कठीण जात नाही.'' बुमराने स्पर्धेत आतापर्यंत सात सामन्यांत 4.6 च्या इकॉनॉमी रेटने 14 गडी बाद केले आहेत. 

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. यॉर्कर टाकण्यात माझी काही मास्टरी नाही. जमत नसेल तर पुन्हा पुन्हा सराव करा. जोपर्यंत समाधान होत नाही, तोवर न थकता चेंडू टाकत राहा. सामन्यात खेळपट्टीचा अंदाज घेतो आणि मग गोलंदाजीचे नियोजन ठरवतो. 
- जसप्रित बुमरा, भारताचा वेगवान गोलंदाज 

loading image