Jasprit Bumrah | मालिका विजयाची संधी हुकल्यानंतर बुमराहने फलंदाजीवर ठेवले बोट

Jasprit Bumrah Says We Short In Batting During 2nd Inning After Match Presentation
Jasprit Bumrah Says We Short In Batting During 2nd Inning After Match Presentationesakal

बर्मिंगहम : पाचव्या कसोटीत इंग्लंडने भारताचा (England vs India) 7 फलंदाज राखून पराभव केला. या पराभवामुळे गतवर्षीच्या कसोटी मालिकेत 2 - 1 ने आघाडीवर असणाऱ्या भारताची मालिका विजयाची संधी गमवावी लागली. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रूटने (Joe Root) नाबाद 142 तर जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) नाबाद 114 धावांची शतकी खेळी केली. दरम्यान, पराभवानंतर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) आपली प्रतिक्रिया दिली.

Jasprit Bumrah Says We Short In Batting During 2nd Inning After Match Presentation
ENG vs IND | टीम इंडियाचा घाबरून बचावात्मक पवित्रा : रवी शास्त्रींचा दावा

सामन्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला, 'कसोटी क्रिकेटचे हेच तर सौंदर्य असते तुम्ही सलग तीन दिवस चांगला खेळ करता. मात्र चौथ्या दिवशी फलंदाजीत थोडे कमी पडता. यामुळे प्रतिस्पर्धी संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळते आणि सामना आमच्या हातून निसटून जातो. जर तरच्या गोष्टी कायम असतातच. जर तुम्ही मागे वळून पाहिले तर पहिल्या सामन्यात पाऊस पडला नसता तर आम्ही आता मालिका जिंकलो असतो.'

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पुढे म्हणाला की, 'काही म्हणा इंग्लंड संघाने दमदार खेळ केला. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केल्यामुळे ही मालिका बरोबरीत सुटली आहे. मालिकेचा हा योग्य निर्णय झाला आहे.' बुमराहने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाची कौतुक केले.

Jasprit Bumrah Says We Short In Batting During 2nd Inning After Match Presentation
ENG vs IND : रूट - बेअरस्टोच्या जोरावर इंग्लंडने रचला इतिहास

तो म्हणाला, 'पंतने जोखीम घेतली. त्याने आणि रविंद्र जडेजाने आम्हाला सामन्यात पुन्हा परत आणले. या दोघांनी जो प्रतिहल्ला चढवला तो जबरदस्त होता. आम्ही सामन्यात आघाडीवर होतो. पंतने आक्रमक फलंदाजी केली. मी त्याबद्दल आनंदी आहे. द्रविड आम्हाला कायम मार्गदर्शन करत होता. आम्ही गोलंदाजी करताना अजून थोडा सरळ मारा करायला हवा होता. त्यामुळे असमान उसळीचा फायदा उचलता आला असता.'

कॅप्टन्सीबाबत जसप्रीत बुमराह म्हणाला, 'कर्णधारपदाबाबत कधी विचार केला नव्हता. मला जबाबदारी घ्यायला आवडते. हे एक चांगले आव्हान आहे. नवीन आव्हान आहे. भारताच्या संघाचे नेतृत्व करणे ही एक सन्मानाची बाब आहे. हा खूप चांगला अनुभव होता.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com