ENG vs IND | टीम इंडियाचा घाबरून बचावात्मक पवित्रा : रवी शास्त्रींचा दावा

Ravi Shastri Criticize Team India 2nd Inning Batting Says Players Fear On Day 4
Ravi Shastri Criticize Team India 2nd Inning Batting Says Players Fear On Day 4esakal

बर्मिंगहम : भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यातील पाचव्या कसोटीत (5th Test) इंग्लंडने भारताचे 378 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच पार केले. इंग्लंडने गतवर्षीच्या कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना 7 गडी राखून जिंकला आणि मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रूटने (Joe Root) 142 धावांची दमदार खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने (Jonny Bairstow) पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावात देखील शतकी (104 आणि 114) खेळी करत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, भारताचे फलंदाज दुसऱ्या डावात घाबरले आणि त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला यामुळे इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले असे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केले.

Ravi Shastri Criticize Team India 2nd Inning Batting Says Players Fear On Day 4
ENG vs IND : रूट - बेअरस्टोच्या जोरावर इंग्लंडने रचला इतिहास

भारताने पाचव्या कसोटीत पहिल्यांदा फलंदाजी करताना 416 धावा केल्या. त्यानंतर भारताने इंग्लंडला 284 धावात गुंडळत पहिल्या डावात 132 धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. त्यांना दुसऱ्या डावात 245 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून चेतेश्वर पुजारा (66) आणि ऋषभ पंत (57) या दोघांनाच अर्धशतकी खेळी करता आली.

दरम्यान, एजबेस्टन कसोटीचे स्काय स्पोर्ट्सवर कॉमेंटरी करणाऱ्या रवी शास्त्रींनी भारताने ज्या प्रकारे दुसऱ्या डावात फलंदाजी केली त्यावर टीका केली. ते म्हणाले, 'मला वाटते की हे निराशाजनक होते. आपण चांगली फलंदाजी करून इंग्लंडला सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नसती.'

ते पुढे म्हणाले की, 'भारतीय संघाने दोन सेशन फलंदाजी करणे गरजेचे होते. मला असे वाटते की ते चौथ्या दिवशी बचावात्मक पवित्र्यात गेले. ते चौथ्या दिवशी घाबरले होते. विशेषकरून उपहारानंतर. विकेट गेल्यानंतरही ते धोका पत्करून आक्रमक खेळू शकले असते. त्यावेळी सामन्यात धावा करणे खूप गरजेचे होते. मला असे वाटते की ते खूप बचावात्मक पवित्र्यात गेले. त्यांनी विकेट लवकर लवकर गमावले. यामुळे इंग्लंडला फलंदाजीसाठी बराच वेळ मिळाला.'

Ravi Shastri Criticize Team India 2nd Inning Batting Says Players Fear On Day 4
ENG vs IND : इंग्लंडचा विक्रमी चेस, मालिका विजयाची संधी भारताने दवडली

रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना गेल्या वर्षी भारताने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत 2 - 1 अशी आघाडी घेतली होती. मात्र मालिकेतील पाचवा सामना हा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला होता. तो सामना 1 जुलैला बर्मिंगहममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा 7 विकेट्सनी पराभव करत इंग्लंडने मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com