बुमरा, पुनम यादवला बीसीसीआयचे प्रतिष्ठेचे पुरस्कार

वृत्तसंस्था
रविवार, 12 जानेवारी 2020

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, की मैदानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच माजी क्रिकेटपटूंचा योग्य सन्मान केला जाणार आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली असून, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीसीसीआयने 2018-19 वर्षातील पुरस्कारांची शनिवारी रात्री घोषणा केली. यामध्ये जसप्रीत बुमरा याला प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर झाला आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील अव्वल गोलंदाज बुमराने जानेवारी 2016 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पदार्पण केले होते. त्याने आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज संघांविरुद्ध प्रत्येकी ५ विकेट घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव केला होता. भारताच्या या विजयात बुमराचा महत्त्वाचा वाटा होता. 

महिला क्रिकेटपटूंमध्ये पुनम यादवने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. याशिवाय भारताचे माजी कर्णधार के. श्रीकांत आणि अंजुन चोप्रा यांना कर्नल सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.1983 च्या विश्वकरंडक विजेत्या संघात श्रीकांत होते. वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात श्रीकांत यांनी भारताकडून सर्वाधिक 38 धावा केल्या होत्या.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, की मैदानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच माजी क्रिकेटपटूंचा योग्य सन्मान केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah Set to Receive Polly Umrigar Award says BCCI