Jasprit Bumrah on playing all three formats : भारताचा दिग्गज अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत, अर्थातच कसोटी, एकदिवसीय व टी-20 मध्ये प्रदीर्घ काळ खेळणे आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. याचसोबत आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचेही त्याने विश्वासाने सांगितले आहे. बुमराह याने आतापर्यंत 45 कसोटी, 89 एकदिवसीय व 70 टी-20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.