बुडत्याचा पाय खोलात! जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर मोठी अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah IPL 2023

Jasprit Bumrah IPL 2023 : बुडत्याचा पाय खोलात! जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर मोठी अपडेट

Jasprit Bumrah IPL 2023 : भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या काही काळापासून पाठीच्या दुखापतीमुळे संघापासून दूर आहे. आता त्याच्या दुखापतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याच्या दुखऱ्या पाठीवर शस्त्रक्रिया होणार आहे. याबाबतची माहिती एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

जसप्रीत बुमराह हा गेल्या काही काळापासून टीम इंडियापासून दूर आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यापासून तो आपल्या दुखऱ्या पाठीवर उपचार घेऊन तंदुरूस्त होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तो फिट झाला असे वाटत असतानाच त्याची दुखापत बळावत आहे. तो आशिया कप, टी 20 वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका आणि आता आयपीएललाही मुकला आहे. तो आशिया कप 2023 ला देखील मुकण्याची दाट शक्यता आहे.

कर्णधार रोहित शर्मा यापूर्वीच सांगितले आहे की त्याचं टार्गेट हे वनडे वर्ल्डकप आहे. वर्ल्डकपसाठी अजून खूप वेळ आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन जसप्रीत बुमराहच्या बाबतीत कोणताही धोका पत्करणार नाहीये. मात्र चाहत्यांना बुमराहला खेळताना पाहून बराच काळ लोटला आहे. आता असं वाटत आहे की हे वाट पाहणं लांबणार आहे.

जसप्रीत बुमराहला 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर खेळताना पाहिले होते. त्यानंतर तो आशिया कप, टी 20 वर्ल्डकपला पाठीच्या दुखापतीमुळे मुकला. टी 20 वर्ल्डकपमध्ये तर त्याची उणीव प्रकर्षाने जाणवली. आता तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेलाही मुकला आहे.

बुमराह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळले असे वाटले होते. मात्र आयपीएल आणि WTC फायनल देखील तो खेळू शकणार नाहीये.

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...