WTC फायनलची भारतातच होणार रंगीत तालीम; येणार इंग्लंडच्या ओव्हलचा फील | Rohit Sharma IND vs AUS 3rd Test | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma IND vs AUS 3rd Test

Rohit Sharma IND vs AUS : WTC फायनलची भारतातच होणार रंगीत तालीम; येणार इंग्लंडच्या ओव्हलचा फील

Rohit Sharma IND vs AUS 3rd Test : भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांची जबरदस्त चर्चा गेल्या दोन कसोटीत झाली. तिसऱ्या कसोटीत देखील अशीच खेळपट्टी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकी गोलंदाजांनी कांगारूंच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले.

मात्र आता या कसोटी मालिकेत खेळपट्ट्या कात टाकरणार असून त्या फिरकीला नाही तर वेगवान गोलंदाजांना साथ देतील. भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंदूर येथे सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी याबाबतचे संकेत दिले. तसंही तिसऱ्या कसोटीत देखील इंदूरची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना हात देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोहित शर्मा तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाला, 'ज्यावेळी आम्ही (भारत आणि ऑस्ट्रेलिया) इंग्लंडमध्ये एकमेकांना भिडू त्यावेळी दोन्ही संघासाठी वेगळाच खेळ होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची अहमदाबादमध्ये रंगीत तालीम होईल याची दाट शक्यता आहे. आम्ही याबाबत आधीच बोललो आहे. आम्हाला खेळाडूंना तयार ठेवावं लागेल.'

रोहित शर्माने शार्दुल ठाकूरबद्दल देखील आपले मत व्यक्त केले. चेष्टेच्या मूडमध्ये असलेला रोहित म्हणाला की, 'शार्दुल ठाकूर हा आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे. तो आमच्या योजनेचा भाग आहे. मात्र तो लग्न झाल्यापासून किती खेळण्यास किती तयार असेल हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला माहिती नाही की तो किती षटके टाकू शकले. मात्र तो आमच्या विचार प्रक्रियेत तो नक्की आहे.'

रोहित पुढे म्हणाला, 'जर आम्हाला इंदूरमध्ये आमच्या मनासारखा रिझल्ट मिळाला. तर आम्ही अहमदाबाद कसोटीत काहीतरी वेगळं करण्याचा विचार करता येईल. मात्र आम्ही अजून अहमदाबादमध्ये पोहचलो नाहीये. आम्हाला तिसरा कसोटी सामना जिंकावा लागले मग यावर बोलता येईल. हेच योग्य ठरेल.'

(Sports Latest News)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...