Asia Cup : नसीम शाहच्या 'त्या' सिक्सरने बाबर आझमला झाली जावेद मियांदादची आठवण

सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सामनावीर शादाब खान यांनीही जावेद मियांदादची आठवण काढली
Javed Miandad to Naseem Shah Asia Cup
Javed Miandad to Naseem Shah Asia Cup

Javed Miandad to Naseem Shah Asia Cup : आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील चौथ्या सामन्यात अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ निश्चित झाले. आता उरलेले दोन सामने केवळ औपचारिकतेसाठी खेळवले जाणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

पाकिस्तानचा सुपर फोरमधील दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध झाला. या सामन्यात 130 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता. शेवटच्या षटकात पाक विजयासाठी 11 धावांची गरज होती, तर संघाची फक्त एक विकेट बाकी होती. अशा स्थितीत नसीम शाहने दोन चेंडूंत सलग दोन षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सामनावीर शादाब खान यांनीही जावेद मियांदादची आठवण काढली.

Javed Miandad to Naseem Shah Asia Cup
T20 World Cup : दुखापती टीम इंडिया जिंकणार का वर्ल्ड कप? 'या' खेळाडूंनी वाढवले टेन्शन

आशिया कपमधील सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. अशा स्थितीत अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारण्याची पाकिस्तानला सुवर्णसंधी होती. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 129 धावा केल्या. पाकिस्तानचा विजय निश्चित वाटत होता, पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी घातक गोलंदाजी केली. 19 षटकात केवळ 119 धावा दिल्या. अशा स्थितीत पाकिस्तानचा पराभव निश्चित वाटत होता, मात्र नसीम शाहने शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

Javed Miandad to Naseem Shah Asia Cup
IND vs AFG : अफगाणिस्तान विरुद्ध हे असेल Playing-11; या खेळाडूंना रोहित देणार संधी!

1986 मध्ये ऑस्ट्रेलिया-आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 245 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने चांगली सुरुवात झाली नाही. नऊ धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट पडली आणि 181 धावांवर अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. 241 धावांच्या स्कोअरवर पाकिस्तानची नववी विकेट पडली. पण जावेद मियांदाद खेळत होता. पाकिस्तानला विजयासाठी अजूनही पाच धावांची गरज होती. जावेद मियांदादने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

नसीम आणि मियांदाद यांनी शेवटच्या षटकात नऊ विकेट्स पडल्यानंतर षटकार ठोकून त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला. कित्येक वर्षांनंतरही चाहते मियादादला विसरलेले नाहीत आणि आता पाकिस्तानी चाहत्यांना नसीम शाहलाही विसरायचे नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com