IND vs AFG : अफगाणिस्तान विरुद्ध हे असेल Playing-11; या खेळाडूंना रोहित देणार संधी!

भारतीय संघ आज अफगाणिस्तानशी भिडणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.
india vs afghanistan playing 11
india vs afghanistan playing 11 sakal

India vs Afghanistan Asia Cup 2022 : आशिया कप मध्ये टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही मॅच जिंकल्या होत्या, पण त्यानंतर सुपर-4 मध्ये गोष्ट पूर्णपणे बदली. भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने लाजीरवाणी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा श्रीलंकेकडून 6 विकेटने पराभव झाला. भारतीय संघ आज अफगाणिस्तानशी भिडणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.

india vs afghanistan playing 11
Ravindra Jadeja Injury : 'दुखापतीनंतर या वयात पुनरागमन करणे सोपे नाही' - जडेजा

आशिया चषकात केएल राहुल फ्लॉप ठरला. त्याला बॅटमधून धावा काढणे कठीण झाले होते. अशा स्थितीत तो टीम इंडियाची कमजोरी बनला आहे. पण आता आशिया कप 2022 च्या शेवटच्या सामन्यात त्याला कर्णधार रोहित शर्मासोबत फलंदाजीची आणखी एक संधी मिळू शकते. सुपरस्टार फलंदाज विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची खात्री आहे. कोहलीने पाकिस्तानमध्ये हाँगकाँग आणि पाकिस्तानविरुद्ध अर्धशतके झळकावली होती.

india vs afghanistan playing 11
VIDEO : अफगाणिस्तानच्या चाहत्यांचे लाजिरवाणे कृत्य, हरल्यानंतर पाकच्या चाहत्यांना मारहाण

सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. आशिया चषकात सूर्यकुमार यादवला चांगली सुरुवात झाली असली तरी त्याचे मोठ्या डावात रुपांतर करता आलेले नाही. यष्टीरक्षकाची जबाबदारी दिनेश कार्तिककडे दिली जाऊ शकते, कारण ऋषभ पंत खराब धावा करण्यात अपयशी ठरला आहे. हार्दिक पांड्या आणि दीपक हुडा यांना अष्टपैलू म्हणून संधी मिळू शकते.

india vs afghanistan playing 11
Asif Ali-Fareed Ahmad Fight : मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट

टी-20 क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र भारताने आशिया कपसाठी केवळ तीन गोलंदाजांना स्थान दिले आहे. अशा स्थितीत या दोन्ही खेळाडूंना खेळवणे निश्चित आहे. रविचंद्रन अश्विनला फिरकीपटू म्हणून संधी मिळू शकते. त्याचबरोबर युझवेंद्र चहलला आशिया कपमध्ये आयपीएलचा फॉर्म कायम राखता आलेला नाही. अशा स्थितीत त्यांच्या जागी रवी बिश्नोईला संघात घेतले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com