.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Cricket In India: आता भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. देशांतर्गत स्पर्धेत प्रोत्साहन देताना बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी याबाबत सोमवारी सोशल मीडियावर महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पुरुषांच्या स्पर्धेसोबतच महिला व ज्युनियर क्रिकेट स्पर्धांसाठीही पुढाकार घेण्यात आला आहे.
विजय हजारे तसेच सय्यद मुश्ताक अली या पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धांमधील लढतींसाठी सामनावीर व मालिकावीर अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच, महिला व ज्युनियर क्रिकेट स्पर्धांमध्येही प्लेयर ऑफ दी मॅच व प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. क्रिकेटपटूंच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही जय शहा यांच्याकडून सांगण्यात आले.