जय शहांनी गांगुलीलाही टाकले मागे; ICC क्रिकेट समितीत वर्णी

 Jay Shah has beaten Sourav Ganguly for ICC Spot
Jay Shah has beaten Sourav Ganguly for ICC SpotESAKAL

बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीला (Sourav Ganguly) देखील मागे टाकत आयसीसी क्रिकेट समितीत (ICC Cricket Committee) स्वतःची वर्णी लावून घेतली. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार सौरभ गांगुली आणि जय शहा हे आयसीसीचे सध्याचे चेअरमन ग्रेग बारक्लेयांच्या जागेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. ग्रेग बारक्ले हे त्यांचा सध्याचा कार्यकाळ वाढवून घेण्यास इच्छुक नव्हते.

 Jay Shah has beaten Sourav Ganguly for ICC Spot
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना थेट मालकीण बाईंचा फोन; म्हणाल्या...

जय शहा यांची आयसीसी क्रिकेट समितीत नव्याने समावेश करण्यात आला आहे. तर माजी खेळाडू श्रेणीतून श्रीलंकेचे माजी कर्णधार महेला जयवर्धने याची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड, आयसीसी एलिट पॅनल अंपायर जोएल विल्सन आणि एमसीसी प्रतिनिधी जेमी कॉक्स हे देखील या समितीत असणार आहेत.

असे असले तरी आयसीसीने रविवारी संचालक ग्रेगोर बारक्ले यांना ऑक्टोबर पर्यंत त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी तयार केले. त्यामुळे आयसीसीला नवा संचालक नियुक्त करण्यासाठी वेळ मिळणार आहेत. या प्रक्रियेत भारतीय क्रिकेट बोर्डाचा मोठा रोल असणार आहे.

 Jay Shah has beaten Sourav Ganguly for ICC Spot
केएल राहुलची 'अ‍ॅक्शन' अथिया शेट्टीची 'रिअ‍ॅक्शन' झाली व्हायरल

रविवारी दुबईत आयसीसीची दोन दिवस बैठक सुरू होती. या बैठकीत भारतीय क्रिकेट बोर्डासाठी महत्वाची घडामोड झाली. बारक्ले यांनी आपले पद ऑक्टोबर पर्यंत सांभाळण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे आता या पदासाठी उमेदवार देण्यासाठी रणनिती आखण्यास भरपूर वेळ मिळणार आहे.

एका आयसीसी बोर्ड सदस्याने सांगितले की, 'बारक्लेयांची फेरनियुक्ती करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. पण, ते त्यांचा संचालक पदाचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यामुळे संचालक पदासाठी नियुक्ती करण्याची प्रक्रिया नोव्हेंबरमध्येच सुरू होईल.'

 Jay Shah has beaten Sourav Ganguly for ICC Spot
'मी प्रशिक्षण दिलेले खेळाडू भारताकडून खेळले'

या निर्णयामुळे बीसीसीआयला वेळ मिळणार आहे. त्यापूर्वी सप्टेंबरमध्ये बीसीसीआयची सर्वसाधारण बैठक होणार आहे. यानंतर बीसीसीआयची गव्हर्निंग बॉडी कशी असेल हे स्पष्ट होईल. बीसीसीआयने आधीच लोधा समितीच्या घटनेत काही बदल करण्यासाठी अपिल केले आहे. लोधा समितीतने शिफारस केलेले काही नियम हे सध्याच्या घडीला व्यवहार्य नाहीत असा मतप्रवाह आहे. आता सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांचा सप्टेंबर महिन्यात कूलिंग ऑफ कालावधी सुरू होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com