'मी प्रशिक्षण दिलेले खेळाडू भारताकडून खेळले'

पृथ्वीला 100 कसोटी खेळताना पाहायचंय : रिकी पाँटिंग
Ricky Ponting Praise Prithvi Shaw
Ricky Ponting Praise Prithvi Shaw esakal

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत हंगामातील आपला दुसरा विजय साजरा केला. या विजयामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या सलामीवीरांनी महत्वाची भुमिका बजावली. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि डेव्हिड वॉर्नरने यांनी आठ षटकात 93 धावांची सलामी दिली. त्यात पृथ्वी शॉने 29 चेंडूत केलेल्या 51 धावांचे मोठे योगदान आहे. दरम्यान, पृथ्वी शॉ यंदाच्या आयपीएल हंगामात दमदार फलंदाजी करत आहे. त्याच्या खेळीवर दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग (Ricky Ponting) जाम खूष आहे.

Ricky Ponting Praise Prithvi Shaw
IPL 2022: भारताच्या दिग्गज खेळाडूचा सल्ला, धोनी सलामीला आला तर...

ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक असलेला रिकी पाँटिंग गेल्या 4 वर्षापासून दिल्ली कॅपिटल्सचा कोच आहे. तो दिल्लीच्या कळपात 2018 मध्ये सामील झाला होता. दिल्लीच्या यशात रिकी पाँटिंगच्या मोटिव्हेशनचाही मोठा हात आहे. त्याचे ड्रेसिंग रूममधील मोटिव्हेशनल स्पीच युट्यूबवर चांगलेच प्रसिद्ध आहेत. पाँटिंगला त्यांच्या संघातील कोणत्या खेळाडूकडे कोणती क्षमता आहे आणि ती कशी वापरून घ्यायची याची चांगली जाण आहे. त्यामुळेच पाँटिंग हा सलामीवीर पृथ्वी शॉ बाबत सातत्याने बोलत असतो. यंदाच्या हंगामात पाँटिंग पृथ्वी शॉ कडून चांगली कामगिरी करून घेण्यासाठी जास्त उत्सुक आहे. रिकी पाँटिंगला वाटते की या युवा खेळाडूकडे भारताकडून 100 कसोटी खेळण्याची क्षमता आहे.

Ricky Ponting Praise Prithvi Shaw
अश्विनच्या 'टायमिंग'वर संगकारा फिदा; म्हणाला...

रिकी पाँटिंग म्हणाला की, 'मी ज्यावेळी पृथ्वीला खेळताना पाहतो त्यावेळी त्याच्याकडे जितकी गुणवत्ता होती तेवढीच गुणवत्ता पृथ्वी शॉकडे आहे. मला त्याला भारतासाठी 100 कसोटी खेळलेला खेळाडू झालेला पाहायच आहे. मी ज्या संघात काम केले त्यांच्यावर नजर टाकली तर लक्षात येईल की मी ज्यावेळी मुंबई इंडियन्सच्या संघात होतो त्यावेळी रोहित खूप तरूण होता. हार्दिक पांड्या क्रुणाल पांड्या खेळले नव्हते. मी ज्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले ते पुढे जाऊन भारताकडून खेळले. मला हेच करायचे आहे.'

Ricky Ponting Praise Prithvi Shaw
कोण आहे कुलदीप सेन? स्टॉयनिसला रोखून ठरला 'रॉयल' गोलंदाज

आयपीएल 2022 मध्ये पृथ्वी शॉने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यात त्याने चांगला फॉर्म दाखवला. मुंबई विरूद्धच्या सामन्यात त्याने 38 धावांची खेळी केली. तर गुजरात विरूद्ध 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर लखनौ सुपर जायंट आणि कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध पाठोपाठ अर्धशतकी खेळी केली. त्याने लखनौ विरूद्ध 61 धावा केल्या होत्या तर कोलकाता विरूद्ध 51 धावांची खेळी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com