

Mumbai Suburbs District Kabaddi championship Trials : जय शंकर चौकने द्वितीय श्रेणीत, तर शिवकन्या मंडळाने कुमारी गटात मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पूर्व विभागात उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. मुंबई उपनगर कबड्डी असो.ने संयोजन संस्था, चारकोप यांच्या सहकार्याने संचालिका नम्रता भोसले यांच्या सौजन्याने कांदिवली, सेक्टर - २ येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे.