World Cup 2019 : भारताला गारद केलेल्या किवीचे कळकळीचे आवाहन

वृत्तसंस्था
Saturday, 13 July 2019

विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव करत अंति फेरीत स्थान मिळविलेल्या न्यूझीलंडच्या अष्टपैलू जिमी निशामने भारतीय चाहत्यांना उद्देशून एक विनंती केली आहे. ज्या भारतीय चाहत्यांनी अंतिम सामन्याची तिकीटे खरेदी केली आहेत ती तिकीटे त्यांना निशामने पुन्हा विकण्याची विनंतर केली आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव करत अंति फेरीत स्थान मिळविलेल्या न्यूझीलंडच्या अष्टपैलू जिमी निशामने भारतीय चाहत्यांना उद्देशून एक विनंती केली आहे. ज्या भारतीय चाहत्यांनी अंतिम सामन्याची तिकीटे खरेदी केली आहेत ती तिकीटे त्यांना निशामने पुन्हा विकण्याची विनंतर केली आहे. 

अनेक भारतीय चाहत्यांनी भारतीय संघ अंतिम सामन्यात स्थान मिळवेल असे समजून अंतिम फेरीचीही तिकीटे काढली होती. आता भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर गेल्याने अनेक चाहते जास्त दरात तिकीटे विकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निशामने भारतीय चाहत्यांना विनंती केली आहे. 

''प्रिय भारतीय चाहत्यानो, जर तुम्हाला अंतिम सामना पाहण्यासाठी यायचे नसेल तर तुमच्या तिकीटांची अधिकृत संकेतस्थळावर पुर्नविक्री करा. मला महितीये यातून नफा मिळवावा अशी इच्छा होणे साहजिक आहे. मात्र, क्रिकेटच्या सर्व खऱ्या चाहत्यांना हा सामना पाहण्याची संधी द्या,'' अशी कळकळीची विनंती त्याने केली आहे. 

त्याच्या ट्विटखाली अनेक भारतीयांनी न्यूझीलंडाच पाठींबा देण्याचे वचन दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jimmy Neesham makes public appeal to Indian fans