Joe Root |बॅटिंगने धावांचा पाऊस पाडणारा ज्यो रूट करतोय बॅटवर जादू? पहा Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Root Viral Cricket Video

बॅटिंगने धावांचा पाऊस पाडणारा ज्यो रूट करतोय बॅटवर जादू? पहा Video

Joe Root: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. लॉर्ड्स कसोटीत जो रूटने दुसऱ्या डावात नाबाद ११५ धावांची खेळी केली आणि 26व्या कसोटी शतकाच्या जोरावर इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. सामन्यांदरम्यान जिथे रूटने आपल्या बॅटिंगमध्ये अनेक विक्रम केले. त्याच वेळी तो त्याच्या बॅटिंग दरम्यान चाहत्यांना जादू दाखवताना दिसला.(Joe Root Viral Cricket Video)

हेही वाचा: कॅस्पर जेव्हा अजून रॅकेट उचलायला शिकत होता तेव्हा नदालने...

सोशल मीडियावर जो रूटचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात रुट नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि जेमिसन बॉलिंगला धावत आहे. पण त्यावेळीस सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला रुटच्या हातात बॅट नव्हते. जो रूटची बॅट स्वतःच उभी होती. रूटच्या या जादुमुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. लोक सोशल मीडियावर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की रूट केवळ फलंदाजीत जादू करत नाही तर तो जादूगारही आहे.

जो रूटने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी विजयी शतक झळकावून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 10000 धावा पूर्ण केल्या आहे. रुटने 170 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 115 धावा केल्या. 10000 धावा करणारा जगातील 14 वा आणि इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी केवळ अॅलिस्टर कूकनेच इंग्लंडसाठी हा पराक्रम केला होता.

हेही वाचा: जो रूटने लॉर्ड्सवर रचला इतिहास, केला 'हा' विक्रम

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर किवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्या डावात किवी संघ 132 धावांत आटोपला होता. इंग्लंडचा संघही पहिल्या डावात केवळ 141 धावाच करू शकला. दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत न्यूझीलंडने 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 277 धावांचे लक्ष्य ठेवले.

किवी संघाने इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचे लक्ष्य दिले होते. जे इंग्लंडने कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. रूट सामनावीराचा मानकरी ठरला. रूटने बेन फोक्ससोबत पाचव्या विकेटसाठी 120 धावांची विजयी भागीदारी केली. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Web Title: Joe Root Bat Holds Itself During 1st Test Eng Vs Nz Fans Viral Video Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top