
जो रूटने लॉर्ड्सवर रचला इतिहास, केला 'हा' विक्रम
Joe Root New Record: जो रूटच्या 26व्या कसोटी शतकाच्या जोरावर इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रुटने 115 धावांची नाबाद खेळी खेळताना शतक पूर्ण केले. यासह न्यूझीलंडने दिलेले 277 धावांचे लक्ष्य गाठून इंग्लंडने विजय मिळवला.
हेही वाचा: तुझी साईज दुधीभोपळ्यासारखी! चहलची कुणी उडवली खिल्ली?
जो रूटने न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी विजयी शतक झळकावून इतिहास रचला. टीम साऊदीच्या दुसऱ्या डावातील 77व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रूटने दोन धावा घेत 26 वे शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या 10000 धावाही पूर्ण केल्या. रुटने 170 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 115 धावा केल्या. 10000 धावा करणारा जगातील 14 वा आणि इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी केवळ अॅलिस्टर कूकनेच इंग्लंडसाठी हा पराक्रम केला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात तरुण 10 हजार धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. सचिन तेंडुलकरने वयाच्या 31 वर्षे 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता. आपल्या कसोटी कारकिर्दीत 10 वर्षात 10000 धावा पूर्ण करणारा रूट हा पहिला खेळाडू आहे. रूटने डिसेंबर 2012 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
हेही वाचा: रियान परागने सोडल मौन, २०२१ मध्ये मैदानात नेमकं घडलं तरी काय?
सामन्यातबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संघ 132 धावांत आटोपला होता. इंग्लंडचा संघही पहिल्या डावात केवळ 141 धावाच करू शकला. डॅरिल मिशेल 108 धावा आणि टॉम ब्लंडेल 96 यांच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 277 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
हेही वाचा: Eng vs NZ 1st Test: लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडचा दमदार विजय
दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि 69 धावांपर्यंत 4 विकेट पडल्या. त्यानंतर रुट आणि स्टोक्सने पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. स्टोक्स 54 धावांवर बाद झाला. रूटने बेन फोक्ससोबत पाचव्या विकेटसाठी 120 धावांची विजयी भागीदारी केली. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Web Title: Joe Root New Record First Player Score 10000 Runs Within First 10 Years Of Test Career Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..