Joe Root IND vs ENG : इंग्लंडला एक फलंदाज पडणार शॉर्ट... अडचणीत आलेल्या इंग्लंडला रूटनं दिलं टेन्शन?

Joe Root Injury
Joe Root Injury esakal

Joe Root Injury IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने सामन्यावर चांगली पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या डावात जवळपास 350 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली असून भारताचा अजून दुसरा डाव संपलेला नाही. त्यामुळे इंग्लंडला त्यांच्या दुसऱ्या डावात जवळपास 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करावा लागू शकतो.

याचदरम्यान, इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कसोटीत 11 हजारांपेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटच्या बोटाला दुखापत झाली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्लिपमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करताना त्याच्या करंगळीला दुखापत झाली.

Joe Root Injury
Shubman Gill IND vs ENG : शुभमन गिलने सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत जात तब्बल सात वर्षाचा दुष्काळ संपवला

या दुखापतीबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या वक्तव्यात सांगितले की, 'जो रूटच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखाप झाली आहे. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात स्लिपमध्ये झेल घेताना रूटला ही दुखापत झाली. इंग्लंडची वैद्यकीय टीम त्यावर उपचार करत आहे. सध्याच्या घडीला तो कधी फिल्डवर परतेल हे सांगता येणार नाही.'

जो रूट क्षेत्ररक्षणासाठी परतला नाही अन् त्याच्या बोटाची दुखापत बरी झाली नाही तर तो फलंदाजीला देखील येण्याची शक्यता नाही. जर तो फलंदाजी करू शकला नाही तर इंग्लंडसाठी ही मोठा धक्का असेल. कारण इंग्लंडला दुसऱ्या डावात जवळपास 400 पेक्षा जास्त धावा करायच्या आहेत.

Joe Root Injury
Ind vs Eng Shubman Gill : गिलचे शुभ संकेत! तब्बल 13 डावांनंतर प्रिन्सची तळपली बॅट

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात दमदार फलंदाजी करत आपली आघाडी 400 जवळ पोहचवली आहे. शुभमन गिलने 104 धावांची शतकी खेळी केली. तर अक्षर पटेलने 45 धावा केल्या. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी रचली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com