
Jofra Archer’s fast ball clean bowls Rishabh Pant : भारत आणि इंग्लंडमध्ये चौथी कसोटी सुरू आहे. या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने जबरदस्त गोलंदाजी केली आणि तीन विकेट घेतल्या. यामध्ये भारताचा महत्त्वाचे फलंदाज रिशभ पंत, रवींद्र जडेजा यांचा आणि जसप्रीत बुमराहच्या विकेटचा समावेश आहे.
जोफ्राने भारताविरुद्धच्या डावातील ११३ वं षटक टाकलं, यामध्ये त्याने टाकलेल्या तिसऱ्या बॉलने तर कमालच केली. कारण, जोफ्राने टाकलेला तो बॉल एवढा वेगात होता की, समोर फलंदाजी करत असलेल्या रिशभ पंतला काही समजण्याच्या आताच तो बॉल स्टम्पवर जाऊन आदळला. यानंतर एक आवाज झाला आणि स्टम्प हवेत तीन कोलांटउड्या घेत पुन्हा दूरवर मैदानावर जाऊन खुपसला गेला. अखेर जोफ्रानेच पुन्हा तो स्टम्प पायाने खाली पाडला.
या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. तर जोफ्राच्या या वेगवान गोलंदाजीचंही कौतुक होत आहे. दुसरीकडे रिशभ पंत जखमी झाल्यानंतरही पुन्हा खेळण्यास मैदानावर उतरलेला होता. मात्र तो अशापद्धतीन आउट झाल्याने चांगलाच निराश झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मोहम्मद सिराज त्याच्या पाठीवर थाप मारून सांत्वन करताना दिसला.
पंत बाद झाल्यानंतर काही वेळात ११५ व्या षटकात बुमराहला जोफ्रा आर्चरने ४ धावांवर बाद केले. डीआरएस इंग्लंडने घेतल्यानंतर एल्ट्रा एजमध्ये त्याच्या ग्लव्ह्जला चेंडू लागल्यानंतर यष्टीरक्षक जॅमी स्मिथने झेल घेतल्याचे दिसले. त्यामुळे भारताचा डावही संपला.
भारताने ११४.१ षटकात सर्वबाद ३५८ धावा केल्या. या सामन्यात पहिल्या दिवशी भारताने केएल राहुल (४६), यशस्वी जैस्वाल (५८), शुभमन गिल (१२) आणि साई सुदर्शन (६१) यांच्या विकेट्स गमावलेल्या होत्या. पहिल्या डावात इंग्लंडकडून बेन स्टोक्सने २४ षटकात ७२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच जोफ्रा आर्चरने ३ विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स आणि लियाम डॉवसन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.