Jonny Bairstow : 6,6,6,6... जॉनी बेअरस्टोने बदला घेतला! अँडरसनमुळे शतक मात्र थोडक्यात हुकलं

Jonny Bairstow Ashes Series
Jonny Bairstow Ashes Seriesesakal

Jonny Bairstow Ashes Series : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात 592 धावांचा डोंगर उभार केला. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या डावात 275 धावांची आघाडी घेतली.

ही आघाडी घेण्यास जॉनी बेअरस्टोने इंग्लंडला मदत केली. त्याने 81 चेंडूत नाबाद 99 धावा ठोकल्या. त्याने हा कारनामा तळातील फलंदाजांना हाताशी घेत केला. (Jonny Bairstow News)

दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर कॅरीने जॉनी बेअरस्टोला स्टम्प आऊट केले होते. हा वाद खूप गाजला होता. त्याचवेळी जो रूटने बेअरस्टो याचा बदला नक्की घेणार असा इशारा ऑस्ट्रेलियाला दिला होता. हा बदला बेअरस्टोने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात घेतला.

Jonny Bairstow Ashes Series
KL Rahul Fitness Update : केएल राहुल आशिया कपसाठी ठोकला शड्डू ; जीममधील Video होतोय व्हायरल

बेअरस्टोने 122.22 च्या स्ट्राईक रेटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत इंग्लंडला पहिल्या डावात 275 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने मिळवलेल्या या आघाडीमुळे त्यांची कसोटीवरील पकड मजबूत झाली आहे. (Ashes Series 2023)

इंग्लंडने आपल्या सात विकेट्स 486 धावांवर गमावल्या असताना जॉनी बेअरस्टोने शेवटच्या तीन फलंदाजांच्या साथीने 106 धावांची भर घालत इंग्लंडला 592 धावांपर्यंत पोहचवले. ख्रिेस वोक्स ज्यावेळी शुन्यावर बाद झाला त्यावेळी बेअरस्टो 27 धावांवर खेळत होता.

Jonny Bairstow Ashes Series
West Indies Vs India 2nd Test Live : विराट कोहली इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

त्यानंतर बेअरस्टोने आपला आक्रमक बाणा दाखवत तळातील मार्क वूड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांच्या साथीने इंग्लंडच्या धावसंख्येत अजून 106 धावाची भर घालून दिली.

त्याने 4 षटकार आणि 10 चौकार ठोकत 81 चेंडूत नाबाद 99 धावा केल्या. मात्र त्याचे धडाकेबाज शतक पूर्ण होण्यासाठी अवघ्या एक धावेची गरज होती त्यावेळी जेमी अँडरसन पायचीत झाला. शतक हुकलेला बेअरस्टोने आपली निराशा न दाखवता विकेटकिपिंगचे पॅड घालण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये परतला.

शतक हुकले तरी लक्ष नसताना स्टम्प आऊट करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा बेअरस्टोने बदला घेतला होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com