अमाप नाही, अचूक सराव करा : जाँटी ऱ्होड्स

शुक्रवार, 3 मे 2019

प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही म्हण चुकीची असून परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशी असायला हवी असे मत दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांनी  व्यक्त केले. 

पुणे : प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही म्हण चुकीची असून परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशी असायला हवी असे मत दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांनी  व्यक्त केले. 

 इंडियन क्रिकेट अकॅडमी च्या सहकार्याने जाँटी ऱ्होड्स नवोदित खेळाडूंना डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षण देत आहेत.  याच पार्श्वभूमीवर क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी आज त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. गप्पांच्या सुरुवातीलाच अस्खलित मराठी बोलणाऱ्या माणसा प्रमाणे नमस्कार म्हणून त्यांनी संवादाला सुरुवात केली आणि उपस्थित  त्यांची मने जिंकली.
कोणत्याही खेळात यशस्वी व्हायचे असेल तर अधिक सरावापेक्षा अचूक सराव महत्त्वाचा आहे असा कानमंत्र त्यांनी आज नवोदित  क्रिकेटपटूंना  दिला.  

 जाँटी ऱ्होड्स यांचे जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांनी मध्ये मिळणारे केली जाते.  आपले क्षेत्ररक्षणाबद्दल बोलताना  त्यांच्या चपळाईची गुपित त्यांनी सर्वांना सांगितले. ते म्हणाले, "लहानपणी पासूनच फक्त क्रिकेटच नाही तर टेनिस बॅडमिंटन आणि हॉकी अशा सर्व खेळांमध्ये सहभाग घेतल्यामुळे धावण्यास उदे किंवा उंच उडी मारणे असुदे या सर्व प्रकारांमध्ये ते पारंगत झाले आणि याचाच फायदा त्यांना क्षेत्ररक्षण करताना झाला."

 दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर जाँटी यांनी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल-हक ला धावबाद केले होते. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली होती.   क्रिकेटमध्ये  नावारुपाला येण्याचे संपूर्ण श्रेय  मी इंजमाम आणि ऑस्ट्रेलियातील माझा फोटो काढलेल्या त्या पत्रकाराला देतो असे त्यांनी हसत हसत सांगितले.

येत्या ३ मे पर्यंत डेक्कन जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावर हे क्रिकेट प्रशिक्षण होत आहे. जाँटी यांना या प्रशिक्षणात वेस्ट इंडिजच्या संघाचे माजी प्रशिक्षक रायन मराॅन हे सहकार्य करत आहेत. या प्रशिक्षणात जाँटी ऱ्होड्स स्वतः पूर्णवेळ मैदानात उतरून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jonty Rohdes shares his valuable insights with people at Deccan Gymkhana Pune