IND vs AUS 1st Test : भारतासाठी खुशखबर! कांगारूंची धडाडती तोफ निकामी, पहिल्या कसोटीला मुकणार

Josh Hazlewood IND vs AUS Test Series
Josh Hazlewood IND vs AUS Test Seriesesakal

Josh Hazlewood IND vs AUS Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर - गावसकर ही चार कसोटी सामन्यांची मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा नागपूर येथे सुरू होत असून भारतीय संघ नागपुरात दाखल झाला आहे. तर कांगारूंचा संघ बंगळुरूमध्ये सराव करत आहे. ही मालिका WTC फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याबाबत दोन्ही संघासाठी महत्वाची आहे.

Josh Hazlewood IND vs AUS Test Series
Pervez Musharraf Death Sourav Ganguly : वाघा बॉर्डरवरून उचलले... सौरव गांगुलीच्या उत्तराने परवेज मुशर्रफ उडालेच!

दरम्यान, भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेला सुरूवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन दुखापतग्रस्त झाल्याचे वार्ता ताजी असतानाच आता ऑस्ट्रेलियाची धडाडती तोफ म्हणून ओळख असलेला जॉश हेजलवूड देखील पहिला कसोटीला मुकणार असल्याची बातमी येऊन धडकली.

जॉश हेजलवूडच्या दुखापतीबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली. दुखापतग्रस्त हेजवलूडच्या जागी स्कॉट बॉलँडला संधी मिळू शकते. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सिडनी कसोटीत हेजलवूडला दुखापत झाली होती. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती.

Josh Hazlewood IND vs AUS Test Series
Asia Cup 2023 BCCI vs PCB : जाळ अन् धूर निघाला संगटच! शहा - सेठी बैठकीत भिडले

ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर चार कसोटी सामने खेळणार आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात मात दिली आहे. त्यामुळे आता या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारतातील कसोटी मालिका जिंकणे गरजेचे आहे.

भारतीय कसोटी संघ (पहिले दोन सामने) :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ :

पॅट कमिन्स (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बॉलँड, एलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जॉश हजलवूड, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशाने, नॅखन लिओन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मीथ, मिचेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर

(Sports Latest News)

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com