Diamond League 2025: सलग तिसऱ्या वर्षी डायमंड लीग जिंकण्यात नीरज चोप्रा अपयशी; जर्मन वेबरचा ऐतिहासिक पराक्रम
Neeraj Chopra: झ्युरिच डायमंड लीगमध्ये जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ९१.५१ मीटर भाला फेकत प्रथमच विजेतेपद पटकावले. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा ८५.०१ मीटरसह दुसऱ्या स्थानी राहिला.
झ्युरीच : यंदा दोहा डायमंड लीगमध्ये ९१.०६ मीटर भाला फेकून नीरजवर मात करणाऱ्या जर्मनीच्या ज्युलियन वेबरने पहिल्याच प्रयत्नात ९१.३७ मीटर फेक केली आणि प्रथमच डायमंड लीगचा विजेता होण्याचा मान मिळविला.