World Archery Championships : ज्योती-परनीत-आदितीची सुवर्ण हॅट्‌ट्रिक;विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत सलग तिसरे विजेतेपद

ज्योती सुरेखा, परनीत कौर आणि आदिती स्वामी या महिलांनी तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले. तर मिश्र दुहेरीत रौप्यपदक मिळाले.
World Archery Championships
World Archery Championships sakal

येचॉन : ज्योती सुरेखा, परनीत कौर आणि आदिती स्वामी या महिलांनी तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले. तर मिश्र दुहेरीत रौप्यपदक मिळाले. महिला कंपाऊंड प्रकारात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ज्योती-परनीत-आदिती यांनी अंतिम सामन्यात तुर्कस्थानच्या हझल बुरुन, आयसे बेरा सुझर आणि बेगम युवा यांचा एकही सेट न गमावता २३२-२२६ असा पराभव केला.

आशिया क्रीडा स्पर्धेतही विजेतेपद मिळवलेले असलेल्या ज्योतीला या विश्वकरंडक स्पर्धेत दुसरे सुवर्णपद मात्र जिंकता आले नाही. प्रियांशबरोबर मिश्र दुहेरीत खेळताना त्यांचा अमेरिकेच्या ऑलिविया डिन आणि सावयार सुलिवान यांच्याकडून १५५-१५३ असा दोन गुणांनी पराभव झाला. ज्योती-परनीत-आदिती यांनी मात्र सुवर्णपदकाची अपेक्षित हॅट्‌ट्रिक केली. गतवर्षी पॅरिसमध्ये झालेल्या विश्वककरंडक (चौथा टप्पा) स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर गेल्या महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्वकरंडक (पहिला टप्पा) स्पर्धेतही विजेतेपद मिळवले होते.

या स्पर्धेत दुसरे मानांकन असलेल्या भारताच्या या महिला संघाने अचूक लक्ष्याच्या अगदी जवळ बाण मारले. केवळ एकच गुण त्यांनी गमावला होता. हीच अचूकता त्यांनी पुढच्या तीन फेऱ्यांमध्येही कायम ठेवली. सहा बाणांच्या पुढच्या फेरीत आपले वर्चस्व अधोरेखित करताना परफेक्ट १०चे पाच वेळा लक्ष्य भेदले.

मिश्र दुहेरीतील अंतिम सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या दोन संघांत झाला. अमेरिकेच्या खेळाडूंनी चांगले पुनरागमन करत सुवर्णपदक जिंकले. भारताच्या ज्योती आणि प्रियांश यांनी पहिल्या फेरीत दोन गुणांची आघाडी घेतली होती; पण तेथूनच अमेरिकेच्या खेळाडूंनी पुनरागमन केले आणि सुवर्णपदकावर आपला हक्क सांगितला.

भारताला प्रथमेश फुगे याच्याकडूनही पदकाची अपेक्षा आहे.

वैयक्तिक प्रकारात तो अंतिम फेरीत पोहोचला आहे. या वाटचालीत त्याने २०२१ मधील विश्वविजेता आणि सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या निको वेनेर याचा पराभव केला आहे. आता त्याचा सामना सातव्या क्रमांकावरील जेम्स लुत्झ याच्याविरुद्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com