गेहलोतांचा राजीनामा?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - भारतीय कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी मृदुला भादुरिया यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असताना जनार्दनसिंग गेहलोत यांनी कबड्डी महासंघाच्या आजीवन अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपण आजीवन अध्यक्षपदावर राहण्यास उत्सुक नाही. हे पद स्वीकारण्यास मला भाग पाडण्यात आले होते. आपण या पदाचा राजीनामा देण्यास तयार आहोत, असे गेहलोत यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याची चर्चा कबड्डी वर्तुळात सुरू आहे. 

माजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू महिपाल यांनी २०१३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्यात काही घराणींनी कबड्डी संघटना आपली खासगी मालमत्ता केली आहे, तसेच खेळाडू भारतीय संघातील निवडीसाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना रक्कम देत असल्याचा आरोप केला आहे.

भारतीय कबड्डी महासंघाच्या सध्या अध्यक्ष असलेल्या मृदुल भादुरिया या अध्यक्ष होण्यापूर्वी कोणत्याही राज्य संघटनेच्या सदस्या नव्हत्या; तसेच कबड्डी खेळाडूही नव्हत्या. त्यामुळे क्रीडा नियमावलीचा भंग होतो, असा दावा करण्यात आला आहे.

Web Title: kabaddi janardan singh gehlot