
मुंबई : ओम कबड्डी प्रबोधिनीच्या वर्धापनदिनाचा सोहळा दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात पार पडला. यामध्ये मुंबईतील विद्यमान खेळाडूंसाठी विमा कवच देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार महेश सावंत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. त्याकरिता सर्व आमदारांना विनंती करून त्यांच्याकडून निधी देण्याची विनंती करेन, असेही महेश सावंत म्हणाले.