अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबेंची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kalyan chaubey

AIFF : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबेंची निवड

Kalyan Chaubey Elected As New President Of AIFF : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी कल्याण चौबे यांची शुक्रवारी निवड झाली आहे. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भुतिया हेदेखील अध्यक्ष पदाच्या शर्यतील होते मात्र, चौबे यांनी या पदावर बाजी मारत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. या निवडणुकीत भुतियाला केवळ एक मत मिळाले, तर चौबे यांना 33 मते मिळाली. या विजयामुळे चौबे एआयएफएफचे पहिले असे अध्यक्ष बनले आहे जे माजी खेळाडू आहेत.

या निवडणुकीत एकूण 34 राज्यांनी भाग घेतला होता, त्यापैकी भुतिया यांना केवळ एका राज्याचे मत मिळाले. एआयएफएफची कमान माजी फुटबॉलपटूच्या हाती येण्याची ही पहिलीच वेळ असून यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. 45 वर्षीय कल्याण चौबे यांनी फुटबॉलमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. ते पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. गुजरात आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे ते या पदासाठी आधीच विजयाचे दावेदार मानले जात होते.

हेही वाचा: Ashok Chavan : फडणवीसांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण तातडीने दिल्लीला जाणार

कोण आहेत कल्याण चौबे

कल्याण चौबे हे भारतीय फुटबॉल संघाचे माजी गोलकीपर आहे. 2019 मध्ये त्यांनी कृष्णानगरमधून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. कल्याण चौबे 1997-98 आणि 2001-02 मध्ये भारतीय गोलकीपर ऑफ द इयर म्हणून निवडले गेले आहेत. चौबे हे कोलकाता जायंट्स मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या दोन्ही संघांसाठीदेखील खेळले आहेत. याशिवाय त्यांनी गोव्याच्या साळगावकर संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.

Web Title: Kalyan Chaubey Elected As New President Of All India Football Federation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Football