
ऑलिम्पिक फायनलिस्ट थाळीफेकपटू कमलप्रीत कौर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) अंतिम फेरीत स्थान मिळवत सहाव्या स्थानावर फिनिश करणारी भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौर (Kamalpreet Kaur) रातोरात स्टार झाली होती. ती 65 मिटर पेक्षा लांब थाळी फेकणारी भारताची पहिली महिला ठरली होती. मात्र आता ती उत्तेजक द्रव्य (Doping Test) चाचाणीत दोषी आढली आहे. तिच्या शरिरामध्ये स्टॅनोझोलोल (Stanozolol) या बंदी असलेल्या अॅनाबोलिक स्टेरॉईडचे (anabolic steroid) अशं सापडल्याने तिचे तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे.
हेही वाचा: हैदराबादने आरसीबीचा 'वेगवान गोलंदाज' लावला गळाला
कमलप्रीत ही अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया राष्ट्रीय कॅम्पमध्ये सहभागी झाली होती. याचबरोबर तिचा समावेश ऑलिम्पिक पोडियम स्कीममध्ये देखील करण्यात आला होता. या आठवड्यात इंडियन एक्सप्रेसने दोन टोकियो ऑलिम्पिकमधील ट्रॅक अँड फिल्डचे खेळाडू एक पूरूष आणि महिला हे डोपिंग टेस्ट फेल झाल्याची बातमी दिली होती. आता अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने ट्विट केले की, 'एआययूने भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचे तातपूरते निलंबन केले आहे. तिच्या शरिरात बंदी असलेले उत्तेजक आढळून आले होते. तिने जागतिक अॅथलेटिक्सच्या उत्तेजक द्रव्य विरोधी नियमांचे उल्लंघन केले आहे.'
जागतिक उत्तेजक द्रव्य विरोधी संघटनेने (WADA) 2021 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये भारत हा डोपिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा देश असल्याचे नमूद करण्यात आले होते. भारतात डोपिंगच्या 152 केसेस आढळून आल्या आहेत. रशियामध्ये 167 डोपिंगच्या केसेस आढळल्या होत्या. रशिया या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्या खालोखाल इटलीचा (157) नंबर लागतो.
हेही वाचा: दादा राजकारणाच्या खेळपट्टीवर फटकेबाजी करणार? अमित शाह घेऊ शकतात भेट
कमलप्रीतने गेल्या वर्षी थाळीफेकमध्ये राष्ट्रीय विक्रम दोन वेळा मोडला होता. मार्चमध्ये झालेल्या फेडरेशन कपमध्ये तिने 65.06 मिटर थाळीफेक केली होती. त्यानंतर जूनमध्ये तिने आपली कामगिरी सुधारत इंडियन ग्रँड प्रिक्समध्ये 66.59 मिटर लांब थाळी फेकली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती अंतिम फेरीत सहाव्या स्थानावर पोहितली होती. ही थाळीफेकीमध्ये भारतीय महिलांकडून करण्यात आलेली सर्वोच्च कामगिरी होती. पात्रता फेरीत कमलप्रीतने 63.70 मिटर थाळी फेकून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.
दरम्यान, या प्रकरणी कमलप्रीतचे प्रशिक्षक राखी त्यागी, अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अदिल सुमरिवाला मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एआययूने 26 वर्षीय कमलप्रीतला नोटिस बजावली आहे.
Web Title: Kamalpreet Kaur A Tokyo Olympics Discus Thrower Provisionally Suspended For Doping Test Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..