हैदराबादने आरसीबीचा 'वेगवान गोलंदाज' लावला गळाला

Sunrisers Hyderabad Replaced RCB net Bowler Sushant Mishra
Sunrisers Hyderabad Replaced RCB net Bowler Sushant Mishra ESAKAL

मुंबई : आयपीएलचा (IPL 2022) 50 वा सामना आज सनराईजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होत आहे. दरम्यान, सामन्यापूर्वीच हैदराबादने आपल्या संघात एक नवीन खेळाडू घेतला. हैदराबादने सुशांत मिश्रा (Sushant Mishra) या वेगावान गोलंदाजाला संघात स्थान दिले आहे. सौभर दुबे (Saurabh Dubey) हा दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी सुशांतला संधी मिळाली आहे. सुशांत मिश्रा हा यापूर्वीही आयपीएलशी जोडला गेला होता. तो यापूर्वी रॉयल चॅलेंजर बेंगलोरसाठी नेट बॉलिंग करायचा.

Sunrisers Hyderabad Replaced RCB net Bowler Sushant Mishra
तुझमें रब दिखता है! सचिन नव्हे तर बाबर आझमचा क्रिकेटमध्ये वेगळाच देव

प्रियाम गर्ग ज्यावेळी भारतीय 19 वर्षाखालील संघाचे नेतृत्व करत होता त्यावेळी सुशांत हा त्या संघाचाही एक भाग होता. दरम्यान, सनराईजर्स हैदराबादने बुधावारी अधिकृत घोषणा केली की दुबे हा पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल सोडत आहे. विशेष म्हणजे दुबे अजूनपर्यंत एकाही सामन्यात खेळला नव्हता.

Sunrisers Hyderabad Replaced RCB net Bowler Sushant Mishra
पृथ्वी शॉच्या नव्या घराचे फोटो पाहिले का? किंमत ऐकून व्हाल थक्क

दिल्ली कॅपिटल्स आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना खूप महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात जर दिल्ली पराभूत झाली तर त्यांच्यासाठी इथून पुढचा प्ले ऑफचा प्रवास अत्यंत खडतर होणार आहे. तर हैदराबादने आजचा सामना जिंकला तर ते प्ले ऑफच्या अगदी जवळ पोहचतील. हैदाराबादने आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यातील 5 सामने जिंकून 10 गुणांसह गुणतकालित पाचव्या स्थानावर आहे. तर दिल्लीने 9 सामन्यातील 4 सामने जिंकले आहेत. ते 8 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

त्यामुळेच ब्रेबॉर्नवर होणारा आजचा सामना हा दोन्ही संघासाठी फार महत्वाचा ठरणार आहे. ब्रेबॉर्नची विकेट सहसा फलंदाजीसाठी चांगली असते. मात्र आयपीएलचे बरेच सामने या मैदानावर झाले असल्याने खेळपट्टी फिरकीला साथ देण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सर्व संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com