
केन विल्यमसनची इंग्लंड दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघात वापसी
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात खेळला होता. त्याच्या कोपराला दुखापत झाली होती. त्यामुळे तो बराच काळ मैदानापासून दूर होता. या दुखापतीतून सावरल्यानंतर तो आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळता दिसत आहे. आता फिट झालेला विल्यमसन न्यूझीलंडच्या (New Zealand) संघात देखील परतला आहे. न्यूझीलंच येत्या 2 जून पासून इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. या दौऱ्यावर ते कसोटी मालिका खेळणार आहेत. या दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपल्या 20 सदस्यांच्या संघाची घोषणा नुकतीच केली आहे.
हेही वाचा: IPL Record : कॅप्टन धोनी टाकणार का विराटच्या पावलावर पाऊल?
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (ICC World Test Championship) गतविजेते न्यूझीलंड यंदाच्या चॅम्पियनशिप रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे. आता केन विल्यमसन संघात परतल्याने त्यांच्या संघाला मजबूती मिळाली आहे. भारताविरूद्ध मुंबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात 10 विकेट घेणाऱ्या एजाज पटेलला देखील संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. याचबरोबर सात वर्षापूर्वी आपला शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या हाशिम रदरफोर्डची देखील संघात वापसी झाली आहे. याचबरोबर मिचेल ब्रेसवेल, कॅम फ्लेचर, ब्लॅर टिकर आणि जॅकव डर्फी या अनकॅप्ड खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा: BCCI चा आदेश! साहाला धमकी देणाऱ्या पत्रकारावर 2 वर्षांची बंदी
या संघात सामील असलेले पाच खेळाडू सध्या आयपीएल खेळत आहेत. यात केन विल्यमसन, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, डेवॉन कॉनवॉय आणि डेरेल मिशेल यांचा समावेश आहे. ते आयपीएल खेळत असल्याने ते सराव सामना खेळू शकणार नाही. न्यूझीलंडचा पहिला सराव सामना हा 20 ते 23 मे रोजी आणि दुसरा सराव सामना 26 ते 29 मे रोजी होणार आहे.
Web Title: Kane Williamson Return To New Zealand Test Team For England Tour
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..