IPL Record : कॅप्टन धोनी टाकणार का विराटच्या पावलावर पाऊल? | MS Dhoni IPL Record Virat Kohli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni IPL Record Virat Kohli

IPL Record : कॅप्टन धोनी टाकणार का विराटच्या पावलावर पाऊल?

मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) नेतृत्व पुन्हा एकदा आपल्या हातात घेतले आहे. रविंद्र जडेजाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चेन्नईचे नेतृत्व सोडले. धोनीने नेतृत्व हातात घेतल्या घेतल्या चेन्नईने रिझल्ट देण्यास सुरूवात केली. त्यांनी सनराईजर्स हैदराबादला पराभूत करत आपल्या तिसऱ्या विजयाला गवसणी घातली. दरम्यान आज चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर बेंगलोरशी भिडणार आहे. या सामन्यात कर्णधार (Captain) म्हणून महेंद्रसिंह धोनीला आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) पावलावर पाऊल ठेवण्याची संधी आहे. (IPL Record)

हेही वाचा: BCCI चा आदेश! साहाला धमकी देणाऱ्या पत्रकारावर 2 वर्षांची बंदी

आजच्या आरसीबी विरूद्धच्या सामन्यात जर महेंद्रसिंह धोनीने फक्त 6 धावा केल्या तर तो विराट कोहली नंतर कॅप्टन म्हणून टी 20 क्रिकेटमध्ये 6000 धावा (6000 T20 Runs as Captain) करणारा दुसरा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी फक्त विराट कोहलीलाच ही कामगिरी करणे शक्य झाले आहे. महेंद्रसिंह धोनीने कर्णधार म्हणून आतापर्यंत 5994 धावा केल्या आहेत. धोनीने या धावा 301 सामन्यात 185 डावात फलंदाजी करत पूर्ण केल्या आहेत. कर्णधार धोनीची सरासरी 38.67 इतकी आहे. यात त्याच्या 23 अर्धशतकांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा: Annual ICC Rankings: T20 चा बादशाह पुन्हा एकदा टीम इंडियाच !

कर्णधार म्हणून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने 6451 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहलीची सरासरी 43.29 इतकी असून त्याने कर्णधारपदी असताना 5 शतके आणि 48 अर्धशतके ठोकली आहेत. विराट आणि धोनी पाठोपाठ या यादीत रोहित शर्मा देखील तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 4721 धावा केल्या आहेत.

आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी विराट नंतर टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 6000 धावा पूर्ण करणारा दुसरा कर्णधार ठरतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गुणतालिकेचा विचार केला तर चेन्नई सुपर किंग्जने तीन सामने जिंकले असून त्यांचे 6 गुण झाले आहेत. सध्या ते गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहेत. तर आरसीबी 10 पैकी 5 सामने जिंकून सहाव्या स्थानावर आहे.

Web Title: Ms Dhoni Close To 6000 T20 Runs As Captain Virat Kohli Is Only Captain To Do So

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top