World Cup 2019 : जयवर्धनेला मागे टाकत विल्यम्सनच्या एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा

वृत्तसंस्था
Sunday, 14 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने पहिली धाव घेतली, तेव्हा तो एका विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला.

लॉर्डस : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने पहिली धाव घेतली, तेव्हा तो एका विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला.

या सामन्यात विल्यमसन 30 धावांवर बाद झाला. त्याच्या नावावर आता 578 धावा झाल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम श्रीलंका कर्मधार माहेला जयवर्धने याच्या नावावर होता. त्याने 2007च्या स्पर्धेत 548 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत विल्यमसन याने दोन शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. त्याची सरासरी 100च्या आसपास रहिली आहे. एका स्पर्धेत 550 हून अधिक धावा करणारा विल्यमसन न्यूझीलंडचा एकमात्र खेळाडू आहे.

सर्वाधिक धावा करणारे कर्णधार :

केन विल्यमसन 578 (2019),

माहेला जयवर्धने 548 (2007) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kane williamson scored most runs in a world cup as a captain