Kane Williamson : 'हा पराभव पचवणे कठीण', कर्णधार विल्यमसनच्या डोळ्यात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kane williamson

Kane Williamson : 'हा पराभव पचवणे कठीण', कर्णधार विल्यमसनच्या डोळ्यात...

Kane Williamson T20 World Cup 2022 : सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 152 धावा केल्या आणि 153 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 5 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला.

हेही वाचा: New Zealand : न्यूझीलंड नवीन चोकर्स! गतविजेत्यांना लोळवले मात्र पाककडून पराभव

पाकिस्तान विरुद्ध पराभवानंतर केन विल्यमसन खूपच निराश आणि डोळे पाणावले सारखे दिसले. त्याने सामन्यानंतर अनेक गोष्टी सांगितल्या. यादरम्यान त्याने मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्या भागीदारीचे केवळ कौतुकच केले आणि या पराभवावरही तो उघडपणे बोलला. विल्यमसन म्हणाला की, आमच्यावर लवकर दबाव आणला. पाकिस्तानने चांगली गोलंदाजी केली. मिचेलच्या खेळीमुळे आम्हाला थोडी गती मिळू शकली. विकेट थोडी कठीण होती. आम्ही निराश झालो आहोत की आम्हाला पाकिस्तानला जास्त मेहनत करायला मिळाली नाही. हा पराभव पचवणे आमच्यासाठी कठीण आहे.

हेही वाचा: New Zealand : न्यूझीलंड नवीन चोकर्स! गतविजेत्यांना लोळवले मात्र पाककडून पराभव

पुढे बोलताना विल्यमसन म्हणाला, ''बाबर आणि रिझवानने आमच्यावर दबाव आणला. खरे सांगायचे तर आपण अधिक शिस्तबद्ध असायला हवे होते. पाकिस्तान नक्कीच विजेते होण्यास पात्र आहे. खूप चांगले क्रिकेट खेळले गेले. सुपर-12 मध्ये आम्ही चांगलं खेळलो. आज आमचा दिवस नव्हता.'' आता पाकिस्तानने अंतिम फेरी गाठली असून आता भारत आणि इंग्लंड यांच्यात त्यांचा सामना कोणत्या संघाशी होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.