भान विसरला; लॉनमध्ये लस घेतल्याने कुलदीप अडचणीत

kuldeep yadav
kuldeep yadavtwitter

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेला फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) कोविड-19 लशीमुळे (coronavirus vaccine) अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. प्रोटोकॉलचे नियम धाब्यावर बसवून लसीकरणावेळी कुलदीपला व्हिआयपी ट्रिटमेंट कशी मिळाली, हा मुद्दा आता चर्चेत आलाय. याप्रकरणात तपासाचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

kuldeep yadav
कोहलीची श्रवणथीच्या आईवरील उपचारासाठी लाख मोलाची मदत

कुलदीप यादवने शनिवार लशीचा पहिला डोस घेतला. लस घेतानाच एक फोटो त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. फोटो शेअर करुन देशवासिंयाना लस घेण्याचे आवाहन त्याने केले. पण फोटोमध्ये तो लॉनमध्ये लस घेत असल्याचे दिसल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले. प्रोटोकॉलचे उल्लंघन करुन त्याला लस कशी दिली गेली, असा प्रश्न उपस्थितीत करण्यात येतोय. कानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

kuldeep yadav
डेटवर बोलवणाऱ्या चाहत्याला मयंतीचा बाऊन्सर!

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कुलदीपला गोविंद नगर स्थित जागेश्वर रुग्णालयात लशीचा पहिला डोस घ्यायचा होता. परंतु कानपुरमधील शासकीय गेस्ट हाउसच्या लॉनमध्येच त्याला लस टोचण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांनीही लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली असताना कुलदीपला व्हिआयपी ट्रिटमेंट का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com