
नवी दिल्ली: भारतीय नेमबाजांनी आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला. कपिल बेनस्ला याने ज्युनियर विभागात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावल्यानंतर गिरीश गुप्ता याने युथ विभागात १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.