Kapil Dev : 'लाज वाटत होती म्हणून तोंड लपवलं!', कपिल देव यांची अश्विनवर बोचरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kapil dev is not satisfied with r ashwin

Kapil Dev : 'लाज वाटत होती म्हणून तोंड लपवलं!', कपिल देव यांची अश्विनवर बोचरी टीका

Kapil Dev on R Ashwin T20 World Cup 2022 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी-20 विश्वचषक 2022 मध्ये शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 10 नोव्हेंबरला उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी अॅडलेड ओव्हरमध्ये येथे होणार आहे. विश्वचषकात भारताच्या या कामगिरीनंतरही भारताचा माजी कर्णधार कपिल देव संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर समाधानी नाही. खास करून त्याने संघाचा अनुभवी खेळाडू आर अश्विनच्या कामगिरीवर बोचरी टीका करत त्यांच्या वर निशाणा साधला.

हेही वाचा: T20 World Cup : भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, 'हा' खेळाडू बाहेर!

भारताने रविवारी झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या सामन्यात 71 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 4 षटकात 22 धावा देत 3 बळी घेतल्या. असे असूनही कपिल देव यांना अश्विन संघात राहणे कुठेतरी खटकत आहे. भारत झिम्बाब्वे सामन्यानंतर बोलताना कपिल देव यांनी रविचंद्रन अश्विनवर आपले मत मांडताना म्हणाले की, आतापर्यंत अश्विन मला आत्मविश्वास दिला नाही. त्याला विकेट मिळाल्या, पण त्याने त्या घेतल्या असे वाटत नव्हते. खरे तर फलंदाज अशा पद्धतीने आऊट झाले की त्यांनाच 1-2 विकेट घेण्याची लाज वाटली.

हेही वाचा: T20 WC : 'या' अंपायर पासून पाकिस्तानची सुटका नाहीच; सेमी फायनल ठरणार वादग्रस्त?

पुढे बोलताना कपिल देव म्हणाले की, अश्विन चेहरा लपवत होता. विकेट घेतल्याने तुम्हाला आत्मविश्वास मिळतो, पण अश्विन माहीत आहे तो लयीत नाही. यादरम्यान कपिल देव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, जर संघ व्यवस्थापनाची इच्छा असेल तर अश्विन संपूर्ण स्पर्धेत सामने खेळू शकतो, परंतु तुम्हाला विरोधी संघाला आश्चर्यचकित करायचे असेल तर युझवेंद्र चहलचा संघात समावेश करावा. सुपर-12 सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने युजवेंद्र चहलला एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले नाही. अश्विनने सर्व 5 सामने खेळले ज्यात त्याने 7.52 च्या इकॉनॉमीसह 6 विकेट घेतल्या आहेत त्यात झिम्बाब्वेविरुद्ध 3 घेतल्या आहेत.