Virat Kohli : अश्विनला डच्चू मिळूतो तर विराटला का नाही, माजी कर्णधाराचा सवाल

Kapil Dev Said If Ravichandran Ashwin Dropped Then Virat Kohli also Dropped In T20I
Kapil Dev Said If Ravichandran Ashwin Dropped Then Virat Kohli also Dropped In T20Iesakal

नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी विराट कोहलीला (Virat Kohli) संघातून वगळण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी कसोटीत जवळापास 450 विकेट घेणाऱ्या रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) कसोटी संघातून वगळले जाऊ शकते तर मग विराट कोहलीला टी 20 संघातून (T20I Team India) का वगळले जाऊ नये असे विधान केले.

Kapil Dev Said If Ravichandran Ashwin Dropped Then Virat Kohli also Dropped In T20I
Steve Smith : सचिन, गावसकरांसह 10 जाणांना मागे टाकत स्मिथने रचला विक्रम

विराट कोहली सध्या मोठ्या बॅडपॅचमधून जात आहे. दुसरीकडे अनेक युवा फलंदाज टी 20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत संघातील आपली दावादेरी प्रबळ करत आहेत. त्यामुळे विराट कोहलीवर टी 20 संघातून गच्छंतीची टांगती तलवार आहे. याबाबतच भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपले मत रोखठोकपणे मांडले.

कपिल देव म्हणाले की, 'हो आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तुम्हाला विराट कोहलीला सक्तीने टी 20 संघातून बाहेर बसवावे लागले. जर जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाच्या अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते मग कधीकाळी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या फलंदाजालाही वगळण्यात आले पाहिजे.' कपिल देव यांनी हे वक्तव्य एका वृत्तवाहिनीवर केले.

Kapil Dev Said If Ravichandran Ashwin Dropped Then Virat Kohli also Dropped In T20I
IND Vs ENG: आज-उद्याही टी-20 मेजवानी; दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय निश्चित!

विराटच्या ऐवजी एखाद्या युवा फलंदाला संधी देण्याबाबत कपिल देव म्हणाले की, 'विराट कोहलीकडून ज्या प्रकारे फलंदाजी करण्याची अपेक्षा केली जाते त्याप्रमाणे तो फलंदाजी करत नाहये. त्याचे नाव हे त्याच्या कामगिरीमुळे झाले होते. मात्र आता तो त्याच्या लैकिकास साजेशी कामगिरी करत नाहीये. त्यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करत असणाऱ्या युवा खेळाडूला विराटमुळे बाहेर बसवू शकत नाही.'

'तुम्ही विंडीज दौऱ्यावर विराटला विश्रांती दिली असे म्हणू शकता काही लोकं त्याला वगळले असेही म्हणू शकतात. प्रत्येक व्यक्तीचा एक दृष्टीकोण असतो. सहाजिकच निवडसमितीने त्याची निवड तो चांगली कामगिरी करत नसल्यानेच केलेली नाही.' कपिल देव यांच्या मते भारताची प्लेईंग इलेव्हन ही आधीच्या पुण्याईवर नाही तर सध्याच्या फॉर्मवर निवडली गेली पाहिजे.'

'तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असताना तुम्ही फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूंना संघात खेळवले पाहिजे. तुम्ही पूर्व पुण्याईवर निवड करू शकत नाही. तुम्ही सध्याचा फॉर्म देखील पाहिला पाहिजे. तुम्ही प्रस्थापित खेळाडू असला तरी तुम्ही सलग पाच सामन्यात फेल गेला ती तुम्हाला संधी मिळेल असे होत नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com