बंगळूर : ४ जून रोजी बंगळूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघ व आयोजकांना जबाबदार धरलंय. सरकारच्या अहवालानुसार, आयपीएल विजयानंतर झालेल्या विजय मिरवणुकीत निर्माण झालेल्या अनियंत्रित गर्दीमुळे ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर ५० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.