
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील काव्या संदीप कासार हिने काकरविटा झापा (नेपाळ) येथे आयोजित कराटे स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीत नेत्रदीपक यश संपादन केले. इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारी काव्या कासार दोन वर्षांपासून कराटे प्रशिक्षण घेत होती. नुकत्याच नेपाळ येथील काकरविटा झापा येथे आयोजित मेयर कप २०२५ स्पर्धेत तिला प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला.