esakal | KBC: धोनीबद्दलच्या प्रश्नावर सेहवाग-गांगुलीला घ्यावा लागला 'रिव्ह्यू'
sakal

बोलून बातमी शोधा

KBC

KBC: धोनीबद्दलच्या प्रश्नावर सेहवाग-गांगुलीला घ्यावा लागला 'रिव्ह्यू'

sakal_logo
By
सुशांत जाधव

सोनी टेलिव्हिजनवरील रिअ‍ॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 13) च्या 13 व्या हंगामातील खास कार्यक्रमात भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हजेही लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतच्या खास एपिसोडमध्ये या जोडीनं क्रिकेटच्या मैदानातील अनेक किस्से शेअर केले. सेहवाग आणि गांगुली या दोघांनी आपल्या फाउंडेशनसाठी 25 लाख रुपये ही जिंकले. बिग बींच्या प्रश्नांचा सामना करताना दोघांनी चारीही लाईफ लाईनचा वापर केला.

विशेष म्हणजे क्रिकेटमधील एका प्रश्नावर त्यांना एक्स्पर्टची मदत घ्यावी लागली. तो प्रश्न होता महेंद्रसिंह धोनीसंदर्भातील. (MS Dhoni). अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमात या जोडीला एक प्रश्न विचारला होता. ट्रेविस डाउलिनच्या स्वरुपात घेतलेली विकेट ही भारताच्या कोणत्या माजी कर्णधाराच्या नावे आहे? असा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला होता. यासाठी सेहवाग-गांगुलीजोडीसमोर चार पर्याय देण्यात आले होते. त्यात 1. एमएस धोनी, 2. मोहम्मद अझरुद्दीन 3 सुनील गावसकर 4 राहुल द्रविड या पर्यायांचा समावेश होता.

हेही वाचा: IND vs ENG : 250 + टार्गेट अन् टीम इंडियाला जिंकण्याची संधी

सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांचा या प्रश्नावर चांगलाच गोंधळ उडाला. दोघांनी वेगवेगळी उत्तर दिली. गांगुली यांनी सुनील गावसकर यांचे तर धोनीने अझरुद्दीनचे नाव घेतले. दोघांची मत वेगवेगळी असल्यामुळे शेवटी त्यांनी एक्सपर्ट ही लाईफ लाईनचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

एक्सपर्टने या प्रश्नाचे उत्तर महेंद्र सिंह धोनीचे असल्याचे सांगितले. 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात धोनीने दिनेश कार्तिकला विकेट किंपिग ग्लोब्ज देत बॉलिंग केली होती. यावेली त्याने ट्रेविस डाउलिनच्या रुपात आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली आणि एकमेव विकेट घेतल्याचेही एक्स्पर्टने सांगितले. एवढेच नाही तर सुनील गावसकर यांच्या ख्यातत जहीर अब्बासच्या रुपात एक कसोटी विकेट असल्याची गोष्टही त्यांनी सांगितली.

loading image
go to top