Maharashtra Khelo India 2025 winners : गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकचा पराक्रम केला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ ब्राँझ अशी एकूण १५८ पदकांची लयलूट करीत अव्वल स्थानाचे शिखर सर केले. महाराष्ट्राने तब्बल नऊ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही यंदाच्या स्पर्धेमध्ये केला आहे.